महाराष्ट्र
श्री विपीन पालीवाल (मुद्दा) यांची चंद्रपूर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ति
Paliwalwaniचंद्रपूर : (सुरेश पालीवाल...) शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्री. विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी, (ता. ३ जानेवारी) 2022 नगर विकास मंत्रालयाने जारी केले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर श्री. विपिन पालीवाल (मुद्दा), (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. श्री. विपीन पालीवाल (मुद्दा) हे 23 जून 2021 पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.